in

मुलांसाठी लस; फायझर इंकला परवानगी मिळण्याची शक्यता

ऑक्टोबरच्या अखेरीस ५ ते ११ वयोगटातील मुलांसाठी फायझर इंकची कोविड -१९ लस अधिकृतरित्या वापरासाठी येऊ शकते असा विश्वास अमेरिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. फाइझरने क्लिनिकल ट्रायल्समधला पुरेसा डेटा अमेरिकन फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए)कडे दिल्यानंतर त्या वयोगटासाठी आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळेल आणि त्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस लहान मुलांना लस देणे शक्य होणार आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की माहिती दिल्याच्या तीन आठवड्यांत लहान मुलांसाठी लस सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही यावर एफडीए निर्णय घेऊ शकते. कोट्यवधी अमेरिकेतील नागरिक लहान मुलांसाठी लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेषत: ज्यांची मुले अलिकडच्या आठवड्यात डेल्टा प्रकारामुळे संक्रमित झाली होती त्यांचा यामध्ये समावेश आहे. व्हाइट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौचींनी सांगितले की जर फाइझरने सप्टेंबरच्या अखेरीस आपला अहवाल दिला तर ऑक्टोबरपर्यंत फायझर उत्पादन तयार करु शकेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Weather update | कोयना धरणाचे ६ दरवाजे १ फुटांनी उघडणार

Corona Update : देशात गेल्या २४ तासांत २८,५९१ नवे रुग्ण