in

Indian Air Force | भारतीय हवाई दलात ‘मेगा भरती’

इंडियन एअरफोर्समध्ये भारती होण्याची तुमची इच्छा असेल तर ही न्यूज तुमच्यासाठी आहे. इंडियन एअरफोर्सने तब्बल 357 पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदांसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज (online application) करावा लागेल. अधिकृत जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार, 357 जागा भरल्या जाणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे. एअरफोर्सच्या afcat.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. इंडियन एअरफोर्सने या व्हॅकन्सीच्या जाहिरातीत परीक्षेच्या तारखांची घोषणा अद्याप केलेली नाही.

शैक्षणिक पात्रता

फ्लाइंग ब्रांचमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित आणि भौतिकशास्त्रात पदवी (Degree in Mathematics and Physics) घेतलेली असणं आवश्यक आहे.

तर, ग्राउंड ड्यूटी पदासाठी 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. कोणत्याही स्ट्रीममधील लॉजिस्टिक्स पदवीधर विद्यार्थी ग्राउंड ड्युटी नॉनटेक्निकलसाठी अर्ज करू शकतात. तर काही अकाउंट सेक्शनमध्ये (account section) कॉमर्स विषयातील पदवीधर (commerce graduate students) विद्यार्थी अर्ज करू शकतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Jitendra Awhad | ”टाटा कॅन्सर सेंटरला दुसरीकडे 100 रुम देणार”

“मृत्यूचा सौदा करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान”