in

पैठणमध्ये दिव्यांगांसाठी लसीकरण सुरू

प्रतिनिधी : सुरेश वायभट

कोरोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. देशात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबली जात आहे. याचा पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यात दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त व सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन दिव्यांग व्यक्तींना लसीकरण मोहिमेमध्ये प्राधान्य देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त व सामाजिक न्याय विभागाने दिव्यांगांना लसीकरण करण्यासाठी प्राधान्य व विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले.

त्यानुसार पैठण शहर व तालुक्यातील दिव्यांगांसाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष श्री शिवाजी गाडे, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र घाटीचे श्री डॉ. भारत चव्हाण लसीकरण विभाग प्रमुख डॉक्टर तेजस्विनी सुरकार यांनी आज शासकीय रुग्णालयात दिव्यांगांसाठी विशेष कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचं वर्चस्व; सेनेला अध्यक्षपद तर राष्ट्रवादी उपाध्यक्षपदी

दारुड्या पत्नीचा पतीनेच केला खून