in

vaccination shortage | सोमवारी ‘या’ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही

कोरोना संसर्ग वाढत चालला असताना लसीच्या तुटवड्यमुळं लसीकरण रखडले आहे. मुंबईतही पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर सोमवारी ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

तर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्याच्या पद्धतीप्रमाणे निर्देशित ५ केंद्रांवर सुरू राहील. ज्यांची कोविन अँपमध्ये नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ(slot) दिलेला आहे, त्यांनीच लसीकरण केंद्रावर लस मिळणार आहे.

सद्यस्थितीत कोविड प्रतिबंध लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्या कारणामुळे महानगरपालिका, शासकीय आणि खासगी कोविड लसीकरण केंद्रात सोमवारी ४५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांचे लसीकरण होवू शकणार नाही.

दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे, मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ५ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे, ते सोमवारी सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत सुरू राहील. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे.

५ लसीकरण केंद्राची नावे पुढीलप्रमाणे:

  • बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर)
  • सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
  • डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर)
  • सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर)
  • वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona virus : राज्यात 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित

लॉकडाऊन करा; कोरोना परिस्थितीवरून कोर्टाचा केंद्राला सल्ला