in

रोज लसीचा पुरवठा होतोय, मंत्र्यांनी राजकारण बंद करावं”- देवेंद्र फडणवीस

राज्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु आता कोरोना लसीमुळे सध्या राजकारण तापले आहे . महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांसाठी पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईत ३ दिवसांचाच लसींचा साठा शिल्लक असून केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

“लसीकरणाबाबत केले जात असलेले आरोप चुकीचे असून राज्य सरकारमधील मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं बंद करावं, लोकांच्या जिवाशी खेळू नये”,असं फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

त्याच प्रमाणे “लसीकरणाबाबतचा आरोप चुकीचा आहे. मुळातच आपली लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक लसींचा पुरवठा आपल्याकडे नियमितपणे होत असतो. लसींचा देशभरात पुरवठा होत आहे. देशात सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो. रोज साठा येत असतो. आपल्याला काही लसींची साठेबाजी करायची नाहीये”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी 2 कोटी मागितले; सचिन वाझेचा गंभीर आरोप