in

वर्ध्यातील कारंजात कोविड सेंटर सुरू करण्याची आमदार केचेची मागणी

वर्धा वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्णांना तालुक्याच्या स्थळापासून 70 ते 80 किलोमीटर अंतरावर उपचारासाठी जावे लागत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने कारंजा येथील ट्रामा केअर सेंटर मध्ये सुसज्ज व्यवस्थेसह तातडीने कोविड सेंटर उभारण्याची मागणी आमदार दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री यांना निवेदनात मागणी केली आहे.

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढ होत असल्याने कारंजा शहरात कोविड रुग्णाला नागपूर ,अमरावती, सेवाग्राम ,वर्धा याठिकाणी उपचारासाठी दाखल करावे लागत असताना अनेकदा अंबुलन्स उपलब्ध होत नाही अनेक रुग्णांना खासगी वाहनाने जावे लागतात काहींचा तर वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आतातर नागपूर येथे रुग्णांना खाटा मिळत नसताना रुग्णाचा जीव टांगणीला लागले आहे.. वर्ध्याच्या परिस्थिती तीच झाली असून नव्याने कारंजा येथे कोविड सेंटर उघडून येथील रुग्णाची सोया उपलब्ध करावे असे आमदार दादाराव केचेनी निवेदनात केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

RR vs DC Live | राजस्थान रॉयल्ससमोर 148 धावांचे आव्हान

Maharashtra Corona : राज्यात आज 61 हजार 952 नवे रुग्ण; 349 रुग्णांचा मृत्यू