in

Rain Update : मिरा भाईंदर, वसई, विरारमध्ये पावसाचा हाहाकार, अनेक रस्ते पाण्याखाली

मुंबई शहर- उपनगरात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसाचा जोर सतत वाढत असल्याने अनेक सखल भागांत पाणी साचयला सुरुवात झाली आहे. वसई , विरार, मिरा भाईंदर, नालासोपारासह अनेक भागांतही मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हाहाकार उडवून दिला. नालासोपारा, वसईतील अनेक झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सकाळच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली तरीही सर्व परिसर जलमय झाला आहे.

यात विरार पूर्वेकडील कण्हेर फाटा येथील जाधव पाड्यात अडकलेल्या 80 नागरिकांना सुऱक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर विरार पूर्व विवा जहांगीड, मनवेलपाडा, विरार पश्चिम विवा जहांगीड, एम बी इस्टेट, नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नगीनदासपाडा, आचोले रोड, संतोषभूवन, वसई एव्हरशाईन, वसंतनागरी या परिसरातील रस्ते अक्ष:शा पाण्याखाली गेले आहेत. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जवळपास 4 ते 6 तासांपासून पावसाने झोडपून काढले आहे.-

मध्यरात्री अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वसईतील कनेर फाटा जाधव नगर येथील बाजूचा नाला तुडुंब भरुन सर्व पाणी चाळीतील घरात शिरले होते. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. हा मुसळधार पाऊस केव्हा विश्रांती घेईल या चिंतेत नागरिकांनी पूर्ण रात्र जागवून काढली. यावेळी मध्यरात्री वसई विरार अग्निशमन दलाने तीनच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत 80 नागरिकांना सुखरुप सुरक्षित स्थळी हलवले.

वसई, विरार परिसरात पाणीच पाणी

वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन जवानांनी अनेक भागांत अडकलेल्या नागरिकांना सुखरुपरित्या बाहेर काढले आहे. आज पहाटे 5 वाजेपर्यंत हे बचावकार्य सुरु होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदत कार्यामुळे मोठी जीवितहानी टळली. वसई फाट्याच्या दिशेने जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तर अनेक भागांतील मुख्य रस्त्यांवर गुडघाभार पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढणे अवघड जात आहे. अनेक वाहने रस्त्यांतच बंद पडली आहे. वसईतील एव्हरशाईन सिग्नल, वसंत नागरी सिग्नल, सर्व पाण्याखाली गेले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

50MP कॅमेरावाला स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली, वाहतूक बंद