in

विराट कोहली कर्णधारपद सोडणार ?

भारतीय कर्णधार विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. विराट कोहलीऐवजी आता रोहित शर्माकडे वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोपवण्यात येईल, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा बीसीसीआयकडून मिळाला नाही.

नवीन रिपोर्टनुसार, विराटच्या जागी रोहितला वन डे आणि T20 चं कर्णधार करण्याची घोषणा होऊ शकते. रोहितला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या त्या वेळी त्याने आपलं नेतृत्त्व सिद्ध केलं. IPL मध्येही त्याने आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवली होती. IPL मध्ये सर्वाधिक जेतेपदं रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. त्यात टी ट्वेण्टी वर्ल्ड कप तोंडावर आला असताना, टीम इंडियात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. सध्या या प्राथमिक चर्चा असल्याचं सांगण्यात येत आहे.

बीसीसीआयच्या माहितीनुसार, विराट कोहली T20 विश्वचषकानंतर स्वत: कर्णधारपद सोडण्याची घोषणा करु शकतो. आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तो हा निर्णय घेऊ शकतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

थोड्याच वेळात नारायण राणे न्यायालयात हजर राहणार

Anil Deshmukh यांना शोधा; ED ची CBI कडे मागणी