in

गोकुळ दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा विश्वास पाटील!

राज्यातील सर्वात मोठ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाची माळ विश्वास पाटील यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे आता मे २०२३ पर्यंत त्यांना गोकुळ संघाचा कारभार पहावा लागणार आहे.

अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचा नवा अध्यक्ष कोण होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे हे माजी अध्यक्ष स्पर्धेत होते. पालकमंत्री सतेज पाटील व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात गुरुवारी प्रदीर्घ काळ चर्चा होऊनही एकमत झाले नव्हते. बंद लिफाफ्यातून आलेल्या नावाचे बैठकीत वाचन करण्यात आले. त्यामध्ये अनेक राजकीय घडामोडींनंतर पुन्हा एकदा विश्वास पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली.

दूध उत्पादकांना प्रती लिटर दोन रुपयांची वाढ, वासाच्या दूधाचा प्रश्न, जादा परतावा यासह अन्य आश्वासनांची पूर्तता केली जाईल. निवडणुकीपूर्वी दूध उत्पादकांना देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करू”असे विश्वास पाटील यावेळी म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची लपवा-छपवी ?

लॉकडाऊनमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; संपूर्ण बारच केला भुईसपाट