in

पाहा कोणत्या व्हिटॅमिन पासून तुमचा कोरोनापासून बचाव होईल?


गेल्या दीड वर्षापासून कोरोना व्हायरस महामारी दरम्यान प्रत्येकजण हे सांगतो की, व्हिटॅमिन घ्या व्हिटॅमिन घ्या. कोरोनापासून बचावासाठी व्हिटॅमिन खा. मात्र, कोरोनापासून बचाव करणाऱ्या व्हिटमिन्सबाबत जगभरातील वैज्ञानिकांमध्ये वाद आहे.

जगभरातील प्रत्येक क्षेत्रातील सेलिब्रिटी सांगतात की, व्हिटॅमिन सी, झिंक, ग्रीन टी, व्हिटॅमिन D किंवा इकीनेसिया खाल्ल्याने इम्यूनिटी सिस्टीम मजबूत होतं. याने कोरोना व्हायरसपासून आपला बचाव होतो. पण काय अशा प्रकारचे सल्पीमेंट्स खाल्ल्याने आपला कोरोनापासून बचाव होतो का किंवा सुरक्षा मिळते का? याबाबत आतापर्यंत पूर्ण माहिती वैज्ञानिकांनी मिळालेली नाही.

गेल्यावर्षी मार्केटमध्ये सप्लीमेंट्सची मागणी वाढली होती. अमेरिकेत कोरोना व्हायरस संक्रमणाच्या पहिल्या आठवड्यातच सप्लीमेंट्सच्या मार्केटमध्ये ३५ टक्के वाढ झाली होती. हा ट्रेंड केवळ अमेरिकेपर्यंत लिमिटेड नव्हता. यूके मध्ये गेल्यावेळी लॉकडाऊनआधी व्हिटॅमिन सी च्या गोळ्यांची विक्री ११० टक्क्यांनी वाढली होती. त्यासोबतच मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या ९३ टक्के जास्त विकल्या गेल्या. तर झिंकच्या गोळ्यांची विक्री ४१५ टक्के वाढली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उत्तर प्रदेशमध्ये 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण

PBKS vs SRH | हैदराबादचा पंजाबवर शानदार विजय