in

वसईत जलभरावाला महापालिका जबाबदार; 70 वर्षीय आजोबाचा साचलेल्या पाण्यात ठिय्या

संदीप गायकवाड | वसईत एका 70 वर्षीय आजोबाने भरपावसात साचलेल्या पाण्यात ठिय्या मांडला आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने आक्रमक होत भर रस्त्यात ठिय्या मांडला असून महापालिकेचा ते निशेष करत आहेत.

वसई-विरारमध्ये थोडेसे जरी पाऊस पडले तरी घरात, सोसायटी आणि मुख्य रस्त्यावर गुडगाभर पाणी साचते. दोन- दोन दिवस पाणी ओसरण्याचे नाव देखील घेत नाही. त्यामुळे वर्षाला घरातील लाखो रुपयांच्या सामानाची नासधूस होते असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच महापालिका, लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा कोणीच लक्ष देत नसल्याने वैतागून अशोक तलाजिया या 70 वर्षाचे आजोबा थेट रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसले आहेत. यावेळी त्यांनी गळ्यात एक बॅनर घातले असून जलभरावास महापालिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठाण्यात घरांवर दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

Monsoon Alert | पुढचे 5 ते 6 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, IMDचा अंदाज