in ,

चेंबूर, विक्रोळी दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाखांची मदत

मुंबईमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासूच मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणवार पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईच्या चेंबूरमधील आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये मध्यरात्री अतिपावसामुळे डोंगर पायथ्याशी बांधलेल्या भिंतीवर दरड कोसळली. त्यामुळे ही भिंत लागूनच असलेल्या घरांवर कोसळली आणि मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. काल मध्यरात्री १२.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. एनडीआरएफचं पथक अजूनही घटनास्थळी असून मलबा हटवण्याचं काम सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चेंबूर, विक्रोळी दुर्घटना : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक!

संग्रहित छायाचित्र

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर