in

मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पावासाचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी आगामी पाच दिवस फार महत्वाचे आहेत. कारण या दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कमी दाबाचा पट्टा आणखी तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने मुंबई, ठाण्यासह कोकणात आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये या कालावधीत जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे.

मुंबई-ठाण्यात २१ जुलैला, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही ठिकाणी २१, २२ जुलैला अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्य़ांतील घाट क्षेत्रातही याच कालावधीत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रात हलका, तर विदर्भात काही ठिकाणी मध्यम सरींची शक्यता देखील सांगण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तानसा धरण भरलं काठोकाठ; 33 गावांना सतर्कतेचा इशारा

IND vs SL 2nd ODI | भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय