भांडुपमधील काही भागात १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तर धारावीतील काही भागामध्ये ५ तास पाणीपुरवठा बंद असेल. अंधेरी आणि धारावी या भागात किमान ५ ते ८ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे. पुरेसा पाणीसाठा करून जपून पाणी वापरावं, असं आवाहन पालिकेच्या जलविभागाकडून करण्यात आलं आहे.
पवईतील अँकर ब्लॉक इथं तानसा पूर्व सागरी ब ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील जलझडप दुरुस्तीचं काम सुरू होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भांडुप परिसरातील जय भीमनगर, बेस्ट नगर, आरे रोड परिसर, फिल्टर पाडा आदी भागात सकाळी १० ते रात्री १० असे १२ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. वांद्रे, अंधेरी आणि सिप्झ आदी भागात काही तास पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहे.
Comments
Loading…