in

“आम्ही रावसाहेब दानवेंकडे शिकवणी लावू…”

राज्यातील विविध प्रश्नांबरोबरच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सातत्यानं चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. दानवे यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे आपण शिकवणी लावायलाही तयार आहोत, असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.

केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. ‘शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे’ असं दानवे म्हणाले होते. रावसाहेब दानवे यांच्या या वक्त्याव्यावर “आम्ही त्यांची शिकवणी लावू… त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू, पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे”, असं सांगत राऊतांनी दानवेंना उत्तर दिलं.

“अशोक चव्हाण सकाळी माझ्याकडे आले होते. ते मराठा आरक्षण उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी माझ्याकडे काही कायदेशीरबाबी मांडल्या. आम्ही चर्चा केली. त्यामुळे ही शिकवणी वगैरे, अभ्यास वगैरे आम्हाला सांगू नका. आम्हाला माहित आहे. हिंमत असेल तर बोलू नका. तुमच्या दरबारात आम्ही आलो होतो प्रधानमंत्र्यांना भेटायला. मुख्यमंत्री स्वत: आले होते. अजित पवार, अशोक चव्हाण सोबत होते. अभ्यास कुणाला शिकवताय. तुम्ही आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा. नाही तर आम्हाला पण शिकवता येतं, असा अशा शब्दात राऊत यांनी दानवेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साताऱ्यात छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू

थर लागणारच… “मनसे” इशारा