in

बळीराजासाठी यंदा पाऊस सुखावणारा

देशभरात कोरोनाचे संकट गडद होत असतानाचा दुसरीकडे एक सुखद बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी वारे अर्थात पावसाबाबत बातमी दिली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान मॉन्सून यंदा सामान्य राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सरासरी ९६ ते १०४ टक्के इतका पाऊस सामान्य समजला जातो. यंदा पावसाचे प्रमाण सामान्य राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यंदा मॉन्सून दरम्यान एल निनोचा प्रभाव कमी राहणार असल्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

एल निनो म्हणेज काय ?
एल निनो हा स्पॅनिश शब्द आहे. काही काळापर्यंत समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामानबदलाला कारणीभूत ठरतेय. ही क्रिया अधूनमधून अचानकपणे घडते. या घटनेचा संबंध पृथ्वीवर होणारी दुष्काळी परिस्थिती, महापूर आणि त्याचा थेट पिकांच्या उत्पादनावर होणारा परिणाम याच्याशी जोडला जातो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Break the chain | लग्नाला नक्की यायचं ! पण …

किराणा दुकान आणि फार्मसी स्टोअरीवरील निर्बंध हटवण्याचे केंद्र सरकारचे आदेश