in

Weather Report | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा; ‘या’ भागात पावसाचा अंदाज

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कुठं हलक्या पावसाच्या सरी तर कुठं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आला. त्यामुळे या ठिकाणी वीजेचे खांब कोसळून त्या भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याचेही प्रकार घडला.

‘या’ भागात अवकाळी पावसाचा अंदाज

मुंबई, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची अंदाज आहे.

  • सोमवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ
  • मंगळवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ
  • बुधवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठाकरे सरकार लबाड नाही तर महावसुली सरकार आहे; फडणवीसांचा हल्लाबोल

Coronavirus | देशात 24 तासांत आढळले 1,68,912 पॉझिटिव्ह रुग्ण