in

पुण्यात अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई ४० किलो गांजा जप्त

पुण्यात अमली पदार्थविरोधी पथकाने पुणे सासवड रस्त्यावरून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून 8 लाख रुपये किमतीचा 40 किलो 511 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सचिन नरसिंग शिंदे वय 33 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार मनोज साळुंखे यांना गोपींनी खबऱ्याकडून हडपसर परिसरात एका चारचाकीतून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार आज आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील सातववाडी बस स्टॉप समोर आलेल्या वॅगनार कारची तपासणी केल्यानंतर यामध्ये 40 किलो 511 ग्रॅम गांजा सापडला.

पोलिसांनी या गांजासहित वॅगनार कार, रोख 40 हजार रुपये, एक मोबाईल फोन असा एकूण 13 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने हा गांजा रामलिंग रोड, शिरूर येथून एका महिलेकडून विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SSC Board Result 2021 | तांत्रिक बिघाडानंतर चौकशी समितीची स्थापना

नाशकात लवकरच शाळेची घंटा वाजणार, छगन भुजबळांनी सांगितली तारीख