in

साप्ताहिक राशीभविष्य | पाहा कसा असेल तुमचा आठवडा ?

आज दिनांक 18 जुलै 2021 रविवार आषाढ ज्येष्ठ शुद्ध नवमी.
आज ग्रहस्थिती मध्ये अतिशय महत्त्वाचा बदल होणार आहे. तो म्हणजे शुक्राचे राशी परिवर्तन. 17 जुलै 2021 रोजी शुक्राचा सिंह राशीत सकाळी 9 वाजून 26 मिनिटानी प्रवेश झाला असुन तिथे तो 18 ऑगस्ट पर्यंत राहील. आणि देवगुरू बृहस्पती शी सम सप्तक योग करेल. गुरु कुंभ राशीत वक्री असून शनि मकर राशीत आहे. सूर्य मंगळ कर्क राशीत स्थित असून बुध मिथुन राशीत उच्च अवस्थेत आहे .या सर्व ग्रह स्थितीनुसार पाहूया हा आठवडा कसा जाईल ते.

मेष
कुटुंब, घर आणि संतती हा या सप्ताहाचा केंद्र बिंदू असणार आहे. रवी च्या राज राशीतील शुक्र गुरूच्या पूर्ण दृष्टीने संतती संबंधात उत्तम फळ देईल. अनेक लाभ होतील. नवी ओळखी फायद्याच्या ठरतील. घर सजावट, खरेदी यावर भर राहील.

वृषभ
अनेक शुभ घटना घडवून आणेल. रखडलेले काम ताबडतोब मार्गी लागेल. घरासंबंधी निर्णय होईल. ऑफिस मध्ये अतिशय छान वातावरणात काम होईल. प्रवास करणे टाळा. अति साहस नको. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

मिथुन
राशीतील उच्चीचा बुध तुम्हाला उत्तम बुद्धिमत्ता प्रदान करेल तसेच धन स्थानातील ग्रह अनेक मार्गानी पैसा मिळण्याची शक्यता निर्माण करतील. खर्च होईल पण आवक उत्तम राहील.भावंड भेट, आणि भाग्य कारक घटना दर्शवतात

कर्क
नुकताच राशीत आलेला रवि तुम्हाला तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करेल. मात्र मंगळ शनिच्या प्रतियोगात असल्यामुळे कठीण प्रसंग येऊ शकतात. एकट्याने प्रवास करणे टाळा. सरकारी नोकरी असणार्‍यांना उत्तम लाभ.

सिंह
राशी मध्ये आलेला शुक्र गुरूच्या दृष्टीत असून सिंह लग्न असलेल्या जातकाना विवाह ठरण्यासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. व्यवसाय धंद्यात छान लाभ मिळतील.

कन्या
परदेशगमन किंवा त्या संबंधी कागद पत्रांची पूर्तता करण्यास अनुकूल आहेत. मात्र ज्यांना मधुमेह आदी विकार आहेत त्यांनी खाण्या पिण्याची काळजी घ्यावी. इच्छा पूर्तीचा काळ.

तुला
दशम स्थानातील कर्क राशीचा रवि आणि मंगळ तुमच्या कार्य क्षेत्रात तुमचे मोठे नाव करणार आहे. आणि त्यापासून मिळणारे आर्थिक लाभ शुक्र महाराज देतील. संतती साठी अतिशय शुभ काळ. नव विवाहित जोडप्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल रक्तदाब असणार्‍यांनी काळजीपूर्वक राहावे. प्रकृतीच्या तक्रारी असतील तर दुर्लक्ष नको. सप्ताह चांगला असून पुढे जाल.

वृश्चिक
ह्या राशीच्या किंवा लग्नाच्या व्यक्तींना हा आठवडा काही अकल्पित संधी मिळवुन देणारा आहे. जुन्या ओळखीच्या व्यक्ती किंवा सरकारी कर्मचारी यांच्या कडून काही योजना मांडल्या जातील ज्या तुम्हाला फायद्याच्या ठरतील.

धनु
पोटाविषयी काही तक्रार असेल तर खूप काळजी घ्या. आर्थिक स्थिती सांभाळा. अनावश्यक खर्च टाळा. मिथुन राशीतील बुध जोडीदाराला व व्यवसायाला शुभ फळ देईल .तुमच्या भाग्य स्थानात असलेला शुक्र आणि तृतीय स्थानातील गुरू प्रवास दर्शवतात. पण सध्या तरी प्रवास टाळलेले बरे. भावंडाची उत्तम प्रगती होईल. कलाकारांसाठी अतिशय शुभ काळ.

मकर
स्त्री रोग किंवा मधुमेह असणार्‍यांनी काळजी घ्या. काहींना अचानक आर्थिक लाभ मिळवुन देईल. राशीतील शनि च्या प्रतियोगात रवि जोडीदार आणि व्यावसायिक चिंता निर्माण करेल.

कुंभ
लग्न जमायचे संकेत आहेत. आर्थिक व्यवहार जपून करा. व्ययस्थानातील ग्रह परदेशातील संधी देतील. तसेच आर्थिक, शारीरिक कष्ट होतील. गुरु कृपा आहे. त्यामुळे सर्व प्रतिकूल परिस्थितीतही तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी राहील.

मीन
परदेशी जाण्याची संधी मिळवुन देतील. बुध वास्तु किंवा वाहन यासाठी अनुकूल आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. शब्द अत्यंत जपून वापरा. शक्यतो मुलांना जपून राहण्याचा सल्ला द्यावा. मधुमेह असणार्‍या व्यक्तीनी तपासणी करून घ्यावी.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

India vs Sri Lanka, 1st ODI live | आज भारत विरुद्ध श्रीलंका सामना रंगणार

Chembur Wall Collapse: चेंबूरमध्ये भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू; विक्रोळीत 7, तर भांडूपमध्येही एक दगावला