in

साप्ताहिक राशी भविष्य 5 एप्रिल – 11 एप्रिल 2021

साप्ताहिक राशी भविष्यमध्ये, चंद्राचं भ्रमण मकर, कुंभ आणि मीन राशीमध्ये राहिल. सूर्य-मीन, गुरु, शनि – मकर, मंगळ राहू – वृषभ, बुध-मीन, केतू-वृश्चिक अशा ग्रहांचे राशीमध्ये भ्रमण राहिल. 10 एप्रिलला शुक्राचं मीनेतून मेषेत राश्यांतर, अंगारक योग आणि या सर्व ग्रहांचे प्रत्येक राशीला काय फलादेश मिळतील ते आपण आज राशी भविष्यमध्ये पाहुयात.

शुभ दिवस – 5, 7
शुभ दिवस – 6, 8, 9, 10, 11

मेष

सप्ताहाची सुरुवात प्रोत्साहित, आध्यात्मिकता, आत्मविश्वास दृढ़ करुन कामाच्या ठिकाणी यश मिळेल. विविध आर्थिक स्त्रोत दृष्टीक्षेपात पडतील. सकारात्मक दृष्टीकोन, दीर्घकालीन योजना यशदायी ठरतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन पाऊल उचलताना तज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. उद्योगधंद्यात आर्थिक गुंतवणूक करताना जपून गुंतवणूक करण्याची गरज आहे. विदेशाशी निगडीत कामांमध्ये यश मिळेल. आळस झटकून उत्साह पुनर्जीवित करा. घरच्यांच्या तब्येतीची तक्रारी येतील, या तक्रारी खर्च देतील. प्रेमप्रकरणात संगनमत गरजेचे आहे.

उपाय – नित्य श्रीमारुती स्तोत्र पाठ.

वृषभ

सप्ताह सुखाचा, जनसंपर्क फायद्याचा ठरेल. कामाची पूर्तता आर्थिक प्रगतीकारक आणि कामाचे मोल ठरेल. वरिष्ठांकडून कौतुक आणि कामाची दखल घेतली जाईल. एकाचवेळी विविध काम करायला लागल्यामुळे वेळेचं बंधन पाळणे खरी कसोटी ठरेल. घाई गडबडीत कुठलाही महत्वाचा निर्णय टाळा. आर्थिक गुंतवणूक करताना आत्मनिरीक्षण आणि स्वतः घेतलेला निर्णय योग्य ठरेल. मानसन्मान मिळेल. घरातील कौटुंबिक वादविवाद शांतता बिघडवतील. रक्तदाब किंवा मनात भयचिंता भासवेल. नविन विवाह जमतील, प्रेमप्रकरणात यश मिळेल.

उपाय – श्री गणेश आराधना, अथर्वशीर्ष पठण करा.

मिथुन

मिश्रफलित सप्ताह असणार आहे. प्रकृतीच्या किंचित तक्रारी येतील. आत्मविश्वासाची कमी भासवतील. भितीचे वलय मानसिक अस्वस्थता निर्माण करुन आपल्या कामाची पूर्तता किंवा परिपूर्णता करण्यास त्रस्त करेल. कामाच्या ठिकाणी नैराश्य, आर्थिक असंतुलन येऊ शकते. व्यवसायात मित्रांचा सहयोग मिळेल. प्रतिस्पर्ध्यांना डोकं वर काढून देऊ नका. कामावर एकाग्रता ठेऊन लक्ष केंद्रितपणा फलदायी ठरेल. संपत्तीचे सर्वच व्यवहार टाळा. स्वतःची आणि आईची तब्येत सांभाळा. घरच्यांच्याशी वैचारिक मतभेद होतील. प्रेमप्रकरणात विवाद झाल्यास मौन पाळा.

उपाय – कन्या पूजन करणे आणि किन्नरांना दान देणे.

कर्क

कामाच्या ठिकाणी जड़त्व तसेच आक्रामकता वाढेल. कष्ट यशदायक, लहानसहान गोष्टीवरून कामाच्या ठिकाणी वाद टाळा. चिंता बाळगू नका चिंतन करा. कामाच्या ठिकाणी स्थान परिवर्तन तसेच बदल्या दीर्घकालीन फायद्यासाठी उपयुक्त ठरतील. उद्योगधंद्यात नवीन कॉन्ट्रॅक्ट तसेच गुंतवणूक फायद्याची ठरेल. नैराश्य मिळाल्यास प्रतिक्रिया टाळा. इलेक्ट्रॉनिक्सवर खर्च होईल. प्रतिकूल काळात मित्र आणि कुटुंबीय साथ देतील. भावंडांशी मतभेद होतील. गुरुंच मार्गदर्शन तारक ठरेल. नवीन प्रेमप्रकरण जुळतील.

उपाय – गाईला हिरवा चारा घालून, श्री मारुती उपासना करावी.

सिंह

सप्ताहाची सुरुवात जोमात असेल पण मध्यान्हात शिथिलता येईल. शुभ बातम्या कळतील, परंतु कामात उतार चढाव येतील. वाणीवर संयम फायद्याचा ठरेल. कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करताना वरिष्ठांशी वाद टाळा. मोठी आर्थिक गुंतवणूक टाळा, परंतु कमी प्रमाणात जोखीम घेऊ शकता. घरामध्ये चोरीची घटना संभावू शकते. मामाच्या घरी तब्ब्येतीच्या तक्रारी पोटाचे विकार, अॅलर्जी सारख्या तक्रारी येऊ शकतात. सासरच्यांकडून लाभ, प्रेमप्रकरणात यश मिळेल.

उपाय – गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू दान करा.

कन्या

सप्ताहाची सुरुवात मिश्रफलित तर उत्तरोत्तर लाभदायक असेल. आत्मविश्वास खालावेल, जनसंपर्काचा फायदा मिळेल. सकारात्मकता कामाची पूर्तता करेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करतील. कार्यकुशलता कार्यामध्ये यशप्राप्ती करेल. भागीदारीमध्ये आर्थिक संतुलन काळजीपूर्वक संयम बाळगून करावे. नोकरीत स्थानांतरण लाभदायक ठरेल. भाग्यदायक ग्रहमान असले तरी विश्वासघात संभावेल. कामात व्यस्त असल्यामुळे कुटुंबाला वेळ न देणे जोडीदाराबरोबर चिड़चिड़ निर्माण करेल. प्रेम प्रकरणात जोडीदाराची साथ मिळेल.

उपाय – गौशालेत दान आणि मारुतीची उपासना.

तूळ

सप्ताह सुखकारक असेल. कष्टाचे चीज होईल. पूर्वगुंतवणूक लाभदायक ठरेल. सद्यस्थितीत तज्ञ मार्गदर्शन आवश्यक आहे. नोकरीत यश, कौतुक तसेच कामाची पोचपावती मिळेल. बढतीचे योग, व्यवहारात गोपनीयता पाळणे महत्वाचं, नाहीतर प्रतिस्पर्धी वरचढ ठरतील. धार्मिक स्थळ, तीर्थक्षेत्र प्रवास होतील. कुटुंबात आदर मिळून खेळीमेळीचे वातावरण असेल. तब्येत स्थिर राहील. वडीलांसाठी तुमचे ग्रहमान इष्ट. प्रेमप्रकरणात वैचारिक मतभेद येतील.

उपाय – गंगाजळ आणि तीळ घालून स्नान करावे.

वृश्चिक

सप्ताहाची सुरुवात सकारात्मक. आयुष्यात उत्साह, आत्मविश्वास असेल. नोकरीच्या ठिकाणी स्वनियंत्रण लाभदायक. प्रतिस्पर्धींवर विजय प्राप्त करण्याचा योग असेल. उद्योगात उत्पादनाची गुणवत्ता सुधारून पुढचं पाउलं फायद्याचे. प्रगल्भीत विचारांचे वरिष्ठांकडून कौतुक तसेच नोकरीत नवीन संधी, बढ़ती मिळवून देतील. नविन वास्तुनिवेश लाभदायक. वाहन योग, तसेच घराच्या इंटीरियर वर खर्च संभावेल. प्रकृतीच्या तक्रारी येतील. जोडीदाराबरोबर वैचारिक मतभेद होतील.

उपाय – श्री रामरक्षा स्तोत्र पठण.

धनु

सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वासाची कमी, एकाग्रता विचलीत करेल. निर्णयक्षमता चुकेल. कामाची ठिकाणी चूका त्रासदायक ठरतील. ग्रहमानानुसार जोडीदाराची बरकत होईल. मानसन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना काही प्रदर्शित करायचे असेल तर पुन:तपासणी आवश्यक असेल. उद्योग करण्यासाठी हीच योग्य वेळ. दीर्घकालीन निवेशासाठी आर्थिक गुंतवणूक फायद्याची ठरेल. सरकारी कामात यश. मोठी भावंड वेळेला मदत करतील. बढतीचे योग येतील. आईच्या व श्वसनाच्या आजारापासून काळजी घ्या. प्रेमप्रकरणात आणि जोडीदाराबरोबर वाद होतील.

उपाय – विष्णुसहस्त्र नाम पठण

मकर

सप्ताहाची सुरुवात सकारात्मक दृष्टीकोनामुळे लाभदायक ठरेल. उत्साह आणि सामर्थ्य हेच यशाची दिशा ठरवतील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होतील. स्वप्रेरणा आणि कार्यकुशलता कामाच्या ठिकाणी गरजेची. उद्योगात नवीन गुंतवणूक नको. घरातील ज्येष्ठ व्यक्ती मानसिक तणाव देऊ शकतील. रागावर नियंत्रण ठेवा. इलेट्रॉनिक वस्तूंची खरेदी टाळा. डोळ्यांच्या डॉक्टरकडे डोळे तपासून घेणे. प्रेमप्रकरणात यश येईल आणि प्रवास घडतील. उपाय- पिंपळाखाली राईच्या तेलाचा दिवा लावून त्यात थोडीशी राई तेलामध्ये वहा.

कुंभ

मिश्रफलित सप्ताह असणार आहे. कामाचे प्रचंड ओझ असणार आहे. परंतु आय-व्यय यांचा समतोल योग्य राखला जाईल. तडकाफडकी निर्णय घेणे टाळा. नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक धोरण कायम ठेऊन कष्टाचे चीज़ होईल. इष्टतम वाणी आणि कार्यकुशलता कामाच्या ठिकाणी योग्य न्याय देईल. उद्योगात नवीन संधी मिळतील. गोपनीयता पाळा. नोकरीत अपेक्षित बदल घडतील. आवडते छंद, कला यातून आनंद मिळेल. वडीलोपार्जित जमिनीतून उत्पन्न मिळेल. शेअर, सट्टामध्ये यश मिळेल. विनाकारण खर्च टाळा. कुटुंबात वादविवाद टाळा. जोडीदाराची तब्ब्येत सांभाळा. प्रेमप्रकरणात जबरदस्तीने मनमारुन कृती टाळा.

उपाय – शिवलिंगावर जलाभिषेक आणि गरीब गरजूंना अन्नदान करा.

मीन

सुनियोजित स्वभाव इच्छापूर्ती साधेल. वाणीवर आणि खाण्यावर नियंत्रण ठेवा. पथ्य पाळा. रागाच्या भरात किंवा अभिमानात निर्णय चुकीचे ठरतील. नविन करार करताना कागदपत्र नीट तपासून पाहा. ग्रहमान अनुकूल नसल्यामुळे चूक नसतानाही अपयश येऊ शकेल. संघर्ष अपेक्षित. बचतीचा स्वभाव नसल्यामुळे आर्थिक टंचाईचा सामना करावा लागेल. परंतु मध्यान्हात कामाच्या ठिकाणी गोष्टी तुमच्या मर्जीने होतील. व्यवसायातही नवीन आकार घेता येईल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, तुमचे मानसिक नैतिकत्व वाढवेल. धनप्राप्ती होईल. चिड़चिड़ कमी होऊन प्रसन्नता वाढेल. कौटुंबिक आर्थिक मदत उद्योगधंद्यात विस्तार करेल. उद्योगात तंत्रद्यानाची मदत गती प्राप्त करेल. नम्रपणा कौटुंबिक वातावरणात प्रसन्नता, उल्हास आणि समतोल आणेल. सप्ताहाच्या शेवटी, आर्थिक आणि मालमत्ता विषयक दीर्घकालीन प्रश्न सुटतील. प्रेमप्रकरणात आणि जोडीदाराबरोबर गैरसमज टाळा.

उपाय – गाईला पालक आणि चारा घाला. ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करा.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Anil Deshmukh Resigns:”यह तो सिर्फ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या?”

नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के