in

साप्ताहिक राशीभविष्य; गुढीपाडव्याच्या या आठवड्यातील विविध योग आणि राशी बद्दल परिणाम जाणून घ्या

सप्ताहांत चंद्राचे भ्रमण क्रमशः मेष, वृषभ आणि मिथुन राशीमध्ये असेल. सूर्य मीन राशीत तर 14 एप्रिलला मेषेत राश्यांतर होईल. शुक्र मेष, मंगळ वृषभ तर 14 एप्रिलला मिथुनेत राश्यांतर, बुध मीन तर 16 एप्रिलला मेषेत राश्यांतर, शनि मकर, राहु वृषभ, केतु वृश्चिक आणि मागच्या साप्ताहांत झालेल गुरुच मीनेत राश्यांतर असे विविध योग आणि राशि बदल यांचा आपल्यावर काय परिणाम होतो ते आपण पाहु.

चैत्र नवरात्रित दुर्गासप्तशती पाठ, दुर्गाकवच – कवच अर्गला कीलक पठण, तसेच शाबरीमाता कवच स्तोत्र, श्रीसुक्त पठण, कुंकुमार्चन आणि कन्या पूजन असे विविध कार्यक्रम ग्रहांची प्रतिकूलता कमी करून सद्य परिस्थितीमध्ये मानसिक आणि शारीरिक बळ प्राप्त करुन देईल.

मेष –
सप्ताहाची सुरुवात प्रसन्न असेल. आत्मविश्वास आणि आत्मनिरीक्षण या गुणांमुळे कठीण कामात सुद्धा यश प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी नविन संधी, इच्छित नोकरीबदलीचे योग घडतील. वरिष्ठ आणि सहकारी यांचा चांगला सहकार लाभेल. कामाचे दौरे यशदायक. उद्योगधंद्यात यश मिळवण्याकरिता विशेष परिश्रम घ्यावे लागतील. नविन उपक्रम, नविन आर्थिक गुंतवणूक आणि नविन एग्रीमेंट करण्यास लाभदायक. सप्ताहाच्या मध्यंतरात मानसिक अशांतता किंवा कौटुंबिक कलह होवून अनैतिक कर्मामुळे मानसन्मान हानी होवू शकते. वडिलांच्या तब्बेतित सुधारणा. भावंड सहकार्य करतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळेल. तब्बेत साधारण असेल परंतु डोळ्याचे विकार जडतील. जोडीदाराबरोबर उत्तम ताळमेळ, नविन दाम्पत्यास शुभ कालावधी.
उपाय – सूर्याला अर्घ्य वहावे. आदित्य ह्रिदय स्तोत्र पाठ.

वृषभ –
मिश्रफलित सप्ताह, सप्ताहाच्या सुरुवातीला मानसिक दडपण जाणवेल. कुठल्यातरी अनामिक भीतिमुळे त्रस्त. आत्मविश्वासाची कमी आणि ऊर्जाऱ्हास भासेल. अचानक खर्च आर्थिक चणचण भासवेल. सप्ताहाच्या मध्यंतरात अडकलेल्या कामात वरिष्ठांच सहकार्य लाभेल. कार्यकौशल्यात सुधारणा. क्रिएटिव कामात प्रतिभेचा अभाव आल्यामुळे कामातील असुरक्षितता वाढेल. उद्योगधंद्यात नविन उत्पादन बाजारपेठेत नविन उच्चांक गाठू शकेल. नविन नोकरीचे योग बनतील. परंतु कोणालाही पैसे उधार देण टाळा परतफेड होणार नाहि. नविन वाहन योग कौटुंबिक वैचारिक देवाणघेवाण घेवून करावेत. कौटुंबिक जीवनात सौदाहर्य बनेल. जोडीदाराबरोबर ईगो टाळून कम्युनिकेशन करा. प्रेमप्रकरणात सहयोग होईल.
उपाय – वैभवलक्ष्मी पूजा तसेच गरिबांना अन्नदान.

मिथुन –
उत्साहवर्धक आणि स्फूर्तिदायक सप्ताह, सप्ताहाच्या सुरुवातीला छानशीं बातमी कळेल. कामाच्यातिकाणी प्रसिद्धियोग. योग्य नियमन आणि प्रशासन ठेवून आधी इच्छा असून न करता आलेल्या कामाला पुनःसुरुवात करू शकता. स्रीवर्गाकडून कामाच्या ठिकाणी सहकार्य लाभेल. मध्यंतरात थोड़ा कठीण काळ जाणवेल. मानसिक संतुलन बिघडू शकेल. आर्थिक गुंतवणूक करण्यास मन धजावेल.शेयर, सट्टा मध्ये गुंतवणूक तद्न्य सल्याशिवाय नको. भाग्य सहयोग. सामाजिक कार्यात स्वतःचा ठसा उमटवाल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक. विदेशाशी निगडित व्यवहारात यश. परंतु आळस ऊर्जार्हास करेल. बेरोजगार जातकाना मित्राच्या ओळखीने नोकरी सहयोग घडेल. उद्योगात नविन संधि, नविन गुंतवणूक फायदेशीर. जोडीदाराबरोबर ताळमेळ सुखद असेल, परंतु घरातील कोणाएका व्यक्तिला समुपदेशन गरजेच. तब्बेतीची काळजी घ्या. ब्लडशुगर, बीपी असंतुलन. दांपत्यजीवन सुखाच, प्रेमप्रकरणात एकांत सुखद.
उपाय – दुर्गासप्तशती पाठ, कन्यापूजन करा.

कर्क –
सप्ताहांत उद्भवणारया समस्या समर्थपणे सांभाळाल. कौटुम्बिक वादात मौन योग्य. समस्यांवर योग्य प्रतिक्रिया दिल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. वर्क प्रेशर वाढल्यामुळे वेळमर्यादा पाळणे अव्हानात्मक. परंतु कामाची कसब तुम्हाला तारुन नेईल. वरिष्ठांची मर्जी राहिल. नोकरीत बढ़ती योग. स्थानांतरण योग. घाईमध्ये आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय नुकसानदायक. आर्थिक परिस्थिति उत्तम. उद्योगात नविन उत्पादन, विशेष लाभ मिळेल. कर्ज मंजूर होतील. सामाजिक कार्यात गती प्राप्त. नविन नेटवर्किंग सफलयोग. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्या. कुटुंबावर खर्च संभावेल. प्रेमप्रकरणात नाराजी.
उपाय – गाईला हिरवा चारा किंवा चण्याची डाळ भीजत घालून घाला.

सिंह –
सप्ताहाची सुरुवात लाभदायक पण आव्हानात्मक असेल. अनामिक भीति दडपण वाढवेल. उगाच भावुक न होता प्रैक्टिकल एप्रोच महत्वाचा ठरेल. प्रतिस्पर्धी फायदा घेतील. नोकरीच्या ठिकाणी स्थानांतरण किंवा परिवर्तन घडू शकेल. व्यवसायात प्रतिद्वंद्विमुळे व्यापारात हानी तसेच शत्रु षड़यंत्र रचु शकतील म्हणुन गोपनीयता पाळा. वडिल आणि मुलाच्या तब्बेतीची काळजी घ्या. सप्ताहाच्या मध्यंतरानान्तर परिस्थिति अनुकूल होईल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिति सुधारेल. आपल्या तत्वनिष्ठ स्वभावाचे सकारात्मक परिणाम सामाजिक जीवनात दिसतील. निर्णयक्षमता अचूक ठरेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. प्रेमप्रकरणात उत्तम नातेसंबंध जुळतील. विवाह जुळण्यास योग्य कालावधी. जोडीदाराला कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. ध्यानधारणा योग करावा.
उपाय – पिंपळ वृक्षाला न स्पर्श करता जल वहावे. केशर टिळक लावावा.

कन्या –
सप्ताहाच्या सुरुवातीला तब्बेतीच्या तक्रारी डोक वर काढतील. हजरजबाबी आणि योग्य निर्णयक्षमता व्यापारात वृद्धि योग देतील. व्यवसायात उत्पादन गुणवत्तेची तडजोड करू नका. कोणाही ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीशी भागीदारी करताना वैचारिक पातळीवर गुणमिलन आवश्यक अथवा नुकसानीचे ठरू शकेल. सप्ताहाच्या शेवटी कामाच्याठिकाणी अनुकूलित वातावरण असेल. अर्थ आय आणि व्यय यांचे प्रमाण संतुलित. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा तसेच कौतुक होईल. वाईट संगतीचे विपरीत परिणाम होतील. मीडिया आणि जनसंचार क्षेत्राशी निगडित कामात यश मिळेल. परिवारात शुभकार्य घडेल. शुभचिंतक वाढतील. आर्थिक परिस्थिति सुधारेल. आईची मानसिक अवस्थेकडे विशेष लक्ष असू दया. जोड़ीदार निवडताना घाईत निर्णय नको. जोडीदाराबरोबर कलह संभवतील.
उपाय – शिवलिंगाजवळ गाईच्या तुपाचा दिवा आणि गाईला गुळ गहु खायला द्या.

तुला –
सप्ताहाच्या सुरुवातीला अडकलेली काम पूर्ण होतील. मानसिक एकाग्रता आणि शारिरीक ऊर्जा, स्फूर्ति आणि आत्मविश्वासाची कमकरता जाणवेल. परंतु नविन आर्थिक स्त्रोत मन आनंदित प्रसन्न ठेवेल. व्यवसायात नविन डील तसेच करार ठरतील. मध्यंतरात कामाच्याठिकाणी योग्य व्यवस्थापनामुळे अधिक जबाबदारी प्राप्त करतील.बढतीचे योग. वरिष्ठांची प्रसन्नता तुम्हाला स्फूर्तिदायक ठरेल. निर्णयक्षमता वाढेल. विदेशहुन मायदेशी परतण्याचे योग घडतील. संपत्तिवरुन विवाद टाळा. वडालोपार्जित धन प्राप्ति योग. परंतु परिश्रमात कमीपणा नको. कौटुंबिक जीवनात सौदाहार्य गरजेच कारण वातावरण तणावपूर्ण होवू शकेल. मधुमेह रक्तदाब यांची विशेष काळजी घ्या. संतुलित आहार आणि योगासन आळस दूर ठेवू शकेल. घरात विवाह संबंधी नविन बोलणी होतील. नविन दाम्पत्यास नविन पाहुणयाची चाहुल लागेल. जोडीदाराबरोबर छान संवाद असेल.
उपाय – श्रीसुक्त पाठ आणि गाईला पोळीच्या लाडवाचा नैवेद्य दया.

वृश्चिक –
सप्ताहांत यश, आनंद आणि कीर्ति यांची प्राप्ति होईल. पूर्वत्रुटिवर मात करुन, पूर्वयोजनाना पुनर्विकसित करण्यास योग्य कालावधी. अडकलेले पैसे मिळाल्यामुळे मन प्रसन्न. वास्तु निवेश किवा वास्तु संबंधित नविन कार्य योग. नोकरी आणि उद्योगात आर्थिक फायद्याच्या नविन संधि उपलब्ध. आपल्या कार्यक्षमतेला नविन चालना मिळेल. आपल्या कार्यक्षमतेला आर्थिक न्याय मिळेल. कार्यविस्तारात गुणवत्तेशी तडजोड किंवा अनैतिकता दीर्घकालीन संकट देईल. मध्यंतरानान्तर अचानक प्रशासन किवा सरकारकडून नोटिस तसेच वादविवादात अडकून नुकसान होवू शकते. परिवारत कलह संभावेल तसेच आईच्या तब्बेतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. मुलांबरोबर वैचारिक मतभेद परन्तु भावंड सहयोग दर्शवतो. धार्मिक कार्य घडतील. दुसऱ्याच्या भंडाणात स्वतःचे हात भाजून घेवू नका. नविन विवाहजुळण्यास उत्तम कालावधी
उपाय – गणपतीला दूर्वा आणि धार्मिक स्थानावर सेवा घ्या.

धनु –
सप्ताहाच्या सुरुवातीला साहस, आत्मबलवृद्धि दिसेल. महत्वपूर्ण निर्णय घेतले जातील. अकस्मात् धनलाभ होतील. आर्थिक स्थिति पूर्वपदावर येवू लागेल. व्यवसायात भागीदारित संबंध बिघडून व्यवसायावर नकारात्मक प्रभाव पडु शकतो. वाणी आणि आचरणात नम्रपणा गरजेचा. नोकरीच्या ठिकाणी छुप्या शत्रूंपासून सावधता बाळगा. कार्य पुनर्निरीक्षण आणि पडताळणी आवश्यक. व्यवसायातील आर्थिक गुंतवणूक विशेष लाभदायक नसेल. सरकारी कमात यश तसेच वडिलांकडून सहयोग प्राप्त होईल. वाहन खरेदिस योग्य काळ. परिवारकडून योग्य सहकार लाभेल. सकारात्मकता येईल. मसालेदार आणि तळलेले पदार्थ स्वस्थ्ास हानिकारक. नविन वैवाहिक स्थळ समोरून येतील. प्रणय जीवनात जुने वाद डोक वर काढतील.
उपाय – दुर्गासप्तशती पाठ आणि विष्णुसहस्त्र नाम पठण.

मकर –
सप्ताहांत मिश्रफल लाभेल. विनाकारण किंवा अचानक खर्च संभवतील. महत्वाच्या उपक्रम ज्येष्ठ वडिलधार्य मंडळींच्या सल्यानेच कराव्यात. सप्ताहाच्या सुरुवातीला कुठलेही कौटुम्बिक किंवा पारिवारिक निर्णय घेताना काळजी घ्यावी, निर्णय चुकु शकतात. नोकरीच्या ठिकाणी कामाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे किंवा वरिष्ठांकडून प्रशंसनीय मोबदला नसल्यामुळे प्रेरणा खचु शकेल. विरोधी षड़यंत्र रचुन वरचढ होवू पहातील. मध्यानंतरात स्रीकडून हानी संभवेल. संपत्ति विवाद समोर येवू शकेल. मानसिक खच्चीकरण होवू शकेल. कार्यक्षेत्रातील वाद नेटाला जातील. अनैतील कार्यातील रूचि मानहानी करू शकतील. संशयीवृत्तीने घात कराल. शेवटच्या प्रभागात, शत्रुंवर विजय प्राप्त होईल. आत्मविश्वास पुनर्जीवित होईल. आर्थिक घडी बसेल. बेरोजगारांना नोकरीचे योग . कोर्टकेसमध्ये यशप्राप्ति. परिवाराला दिलेल्या वागणुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली जाईल. जोडीदाराबरोबर कलह मानसिक शांति विचलित करतील. प्रेमविवाहाचे योग घडतील.
उपाय – गोरगरिबाना तांदुळ दान करा. घरि गणपतीला तुपाचा दिवा लावावा.

कुंभ –
सप्ताहांत लाभदायक घटनांसाठी विशेष परिश्रम आवश्यक. आत्मविश्वासाची कमी मानसिक दुर्बलता वाढवून निर्णयक्षमता चुकेल. एखाद्या गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त विचार करण नुकसानीच. करिअरच्या दृष्टीने लाभदायक ग्रहमान. परंतु वेळेच नियोजन आणि कठोर परिश्रम आवश्यक. व्यवसायात प्रतिस्पर्धी सामना करावा लागेल. नाविन्यपूर्ण विचार, एकाग्रता आणि योग्य अंमलबजावणी नोकरीत तसेच उद्योगात प्रगतीची गुरुकिल्ली ठरेल. प्रवास फायद्याचे. व्यावहारिक लेखन कौशल्य आणि समयसूचकता वरिष्ठांकडून प्रशंसा मिळवून देतील. जोडीदाराबरोबर मैत्रीपूर्ण संबंध गरजेचे. व्यापारात आर्थिक गुंतवणूक करताना विशेष लक्ष देण्याची गरज. बिनविचारी गुंतवणूक धोकादायक. परिवारात कलह परंतु समाजस्याने प्रश्न सोडवता येतील. अनिश्चित झोप तसेच छातीचे विकार. प्रेमप्रकरणात निराशा.
उपाय – गाईला हिरवा चारा अथवा पालक घालणे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामान दान करा.

मीन –
सप्ताहाच्या सुरुवातीला गूढ कारणामुळे मानसिक अशांतता. परंतु ग्रहमान अपेक्षित फलित देईल. करिअर मध्ये अभूतपूर्व आव्हनांचा सामना यशदायी करता येईल. परन्तु कुठलेही महत्वपूर्ण निर्णय टाळावेत. सप्ताहाच्या सुरुवातीला अनैतिक कार्यात मन मग्न होईल. त्याचे विपरीत परिणाम दीर्घकालीन असतील. अधिक वर्कलोडमुळे व्यथित न होता एकाग्रता कायम ठेवावी. पैसे उधार दिलेत तर परत येणार नाहीत. मध्यंतरात आर्थिक स्थिति सुधारेल. वरिष्ठांकडून कार्याची दखल घेतली जाईल. नविन नोकरीचे ऑफर लेटर मिळू शकेल. आत्मपरीक्षण गरजेच. नोकरीत शुभबातामि मिळेल. गुंतवणुकीस योग्य कालावधि आणि त्यातून अर्थार्जन होईल. कर्जमुक्ति होईल. कायद्याच उल्लघन टाळा. विदेशी निगडित कार्यात धनलाभ. वेळेवर आहार न घेतल्यामुळे पोटाचे विकार. परिवारासाठी वेळ न देण्यामुळे जोडीदाराबरोबर खटके तसेच नकारात्मकता येवू शकेल.
उपाय – ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करा. गुरुसेवा करा.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जयंत पाटलांचं पावसात भाषण; पवारांच्या ‘त्या’ सभेची आठवण

रेमडेसिवीरबाबत केंद्र सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय