in

West Bengal Election | निवडणूक आयोगाची भाजपा नेत्यावर मोठी कारवाई

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु आहे. केंद्रीय निमलष्करी दलांबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी आणि धार्मिक अभिनिवेश असलेली वक्तव्यं केल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने २४ तासांसाठी प्रचारबंदी लागू केल्यानंतर आता भाजपा नेत्यावरही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने भाजपा नेते राहुल सिन्हा यांच्यावर कारवाई केली असून ४८ तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे.

भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी बिहारमधील सीतलकूची येथे चार नाही तर आठ लोकांना ठार करायला हवं होतं असं वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी त्यांच्यावर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना नोटीस पाठवली आहे.

निवडणूक आयोगाने घातलेली प्रचारबंदी मंगळवारी संध्याकाळी सुरु होत असून १५ एप्रिलला दुपारी १२ वाजेपर्यंत कायम असेल. सीतलकूची येथील हिंसाचारात पाच लोकांनी आपला जीव गमावला होता. यामध्ये चार जणांना केंद्रीय दलाकडून गोळ्या घालण्यात आल्या होत्या. राहुल सिन्हा यांनी यावर बोलताना चार नाही तर आठ जणांना गोळ्या घालायला हव्या होत्या असं म्हटलं होतं.

तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने २४ तासांसाठी प्रचारबंदी लागू केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी असल्याची टीका करत त्याविरुद्ध मंगळवारी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी जाहीर केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

म्हाडाचं ताडदेव हॉस्टेल महिलांसाठी राखीव… एक हजार महिलांसाठी सुविधा

संग्रहित छायाचित्र

नागपूर : ऑक्सिजन न मिळाल्याने कन्हान परिसरात चौघांचा मृत्यू…