in

West Bengal Election : दुसऱ्या टप्प्यातील तोफा थंडावल्या… नंदीग्रामच्या उमेदवारांचे ‘देव पाण्यात’


पश्चिम बंगालमध्ये येत्या १ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. शेवटचा दिवस नंदीग्राममधील निवडणूक रॅलींनी गाजला. एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्हिलचेअरवर रॅली काढली. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा रोड शो करून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.

ममता यांचे जुने सहकारी शुवेंदू अधिकारी यांना हाताशी घेऊन भाजपाने या निडणुकीत रंग आणला. त्यातच ज्या नंदीग्रामच्या जागेपासून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या, त्या ठिकाणी भाजपाने तृणमूल काँग्रेसला सुरुंग लावण्यासाठी तयारी केली आहे.

आजच्या रोड शोसाठी भाजपाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाह दोघांनीही नंदीग्रामच्या सीटसाठी मतदारांपर्यंत पोहोचत जोर लावला. तसेच काही वेळानंतर नुकतेच भाजपात आलेले मिथून चक्रवर्ती यांनी देखील शुवेंदू अधिकारींच्या प्रचाराची कमान सांभाळली.

बलरामपूरमध्ये ममता बॅनर्जी यांच्या रॅलीदरम्यान जय श्रीराम च्या घोषणाही देण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Update | पृथ्वीराज चव्हाणांनी ठाकरे सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या

भाजप खासदाराच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची चर्चा…