पश्चिम बंगालमध्ये आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. एकूण 31 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र याठिकाणी एकी टीएमसी नेत्याच्या घरी 4 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स अर्थात EVM आणि 4 वोटर-व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPATs) सापडल्याने खळबळ उडाली आहे. उलूबेरिया विधानसभा मतदारसंघात सोमवारी रात्री ही घटना घडली.
दरम्यान भाजपचे उमेदवार चिरन बेरा यांनी असा आरोप केला आहे की, या मशीन्स टीएमसी नेते गौतम घोष यांच्या तुलसीबेरीया याठिकाणच्या घरात सापडल्या आहेत. त्यांनी असा देखील आरोप केला आहे इलेक्शन ड्यूटीच्या कारमधून या मशिन्स आणण्यात आल्या आहेत. त्यांच्या मध्ये सेक्शन 17 मध्ये इलेक्शन ड्यूटीसाठी असणारी गाडी या टीएमसी नेत्याच्या घराबाहेर उभी होती.
Comments
Loading…