in

WB Election 2021 | पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल; टीएमसी की भाजप मारणार बाजी

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी जाहीर केले जाणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. या राज्यात टीएमसी आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. भाजपनं आपली संपूर्ण ताकत पणाला लावली आहे. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, उद्या 2 मे रोजी सर्व विधानसभा जागांचा निकाल जाहीर होणार असून ममता बॅनर्जी आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होतात की भाजप सत्तापालट करणार, काँग्रेस आणि डावे काय करिष्मा करणार याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MI vs CSK | मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा निर्णय

Election Result 2021 | 5 विधानसभांसाठी आज मतमोजणी, प. बंगाल, केरळ, तामिळनाडूमध्ये कोण मारणार बाजी?