in ,

…पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय? उर्मिला मातोंडकरांचा खोचक सवाल

उत्तराखंडचे भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी नुकतचं महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक अभिनेत्रींनी ट्वीट करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. याच मुद्द्यावर आता शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी ट्वीट करून भाजपला सुनावले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी विमान प्रवासा दरम्यानचा एक किस्सा सांगितला. यामध्ये ते म्हणाले, विमानात माझ्या बाजूला एक महिला बसली होती. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा खाली गमबूट, गुडघ्यावरची जीन्स फाटली होती, हातावर कडेच-कडे, असा तिचा अवतार होता. तिची विचारपूस केली असता तिने दिल्लीला जात असल्याचे सांगितले. मी स्वयंसेवी संस्था (NGO) चालवते असे तिने सांगितले. मात्र, गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती एनजीओ चालवते, समाजात जाते, सोबत लहान मुलं आहेत, या सगळ्यातून काय संस्कार होणार?”, असा सवाल तीरथ सिंह रावत यांनी केला होता.

रावत यांच्या या विधानानंतर अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत टीका केली. उर्मिला मातोंडकर यांनी यावर फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय? असा सवाल त्यांनी रावत यांना केला आहे. याशिवाय ट्विटरवर अनेक युजर्सनी रावत यांच्यावर टीका केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ind Vs Eng 4th T-20 : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय

सचिन वाझेंची ‘ती’ काळी मर्सिडिस भांडुपमध्ये कशी आली? आमदार नितेश राणेंचा सवाल