in , ,

Second Wave Corona; पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फरक काय ?

देशातील अनेक राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हि दुसरी लाट देशात पसरत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. तसेच ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक गंभीर आहे. दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फरक काय ? तो जाणून घेऊयात…

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे.

महत्वाचे मुद्दे

  • फेब्रुवारीच्या अखेरीस व मार्चच्या सुरुवातीला महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या पेक्षा दुप्पट वेगाने रुग्णसंख्या वाढत असल्याचे तज्ञ सांगतात.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमणाची तीव्रता अधिक आहे.
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोना विषाणूमध्ये डबल म्युटेशन (Double Mutation) आढळून आलं आहे.
  • डबल म्युटेशनमुळे (Double Mutation) रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र हा किती धोकादायक ठरू शकतो, याचा अंदाज अद्याप लागू शकला नाही आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील स्ट्रॅन्स बरेच मजबूत असल्याचे सांगितले जाते. तज्ञाच्या मत हा स्ट्रॅन शरीरातील महत्वाच्या अवयवांवर अधिक खोलवर हल्ला करत आहे.
  • संशोधनानुसार भारतातील रुग्णामध्ये दुसऱ्या लाटेत आढळलेला स्टेन हा पहिल्या स्टेनपेक्षा खूपच वेगळा आहे. गुजरातमधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या स्टेनमध्ये रुग्णांच्या ओटीपोटात वेदना, मळमळ, उलट्या आणि अगदी सर्दी होण्यासह विषाणूची असामान्य लक्षणे समोर येत आहेत.
  • कोविड रूग्णांमध्ये वाढत्या इतर लक्षणांमध्ये सांध्यातील वेदना, मायजीलिया, लैंगिकदृष्ट्या कार्यशील गुंतागुंत, अशक्तपणा आणि भूक न लागणे यांचा देखील समावेश आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sachin Vaze Letter: वाझेचा ‘लेटरबॉम्ब’, वाचा काय लिहिलंय पत्रात!

‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेचे जरा हटके होर्डिंग