in

मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ? भाजपचा सवाल

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर राजकारण चांगलेच तापले असून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ? असा सवाल भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे. परमबीर सिंह यांनी ज्यांना 100 कोटींबद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ? असा खोचक सवाल त्यांनी केलाय. “नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे अस दिसतंय. ज्यांना परमवीर सिंह यांनी 100 कोटींबद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ? मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ?? ” असं राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना सीबीआयकडून प्राथमिक चौकशी करण्यात येणार असल्यामुळे गृहमंत्रिपदावर असणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पत्रकारबांधवांना मिळणार कोरोना लस!

IPL 2021; आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज दिसणार नवीन जर्सीत