व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युझर्ससाठी नवीन अपडेट्स आणत असतो. व्हॉट्सअॅपने ई-कॉमर्ससाठी दोन खास फीचर्सची घोषणा केली आहे, ज्याद्वारे लोकांना व्यवसायाला फक्त मोबाईल फोनपेक्षा व्हॉट्सअॅप वेब / डेस्कटॉप वरून त्यांचेकॅटलॉग तयार करण्याची क्षमता देत आहेत.
व्हॉट्सअॅपने एका निवेदनात म्हटले आहे की,’बर्याच कंपन्या कंप्यूटरद्वारे त्यांची इंवेंट्री व्यवस्थापित करत असल्याने, हा नवीन पर्याय नवीन वस्तू किंवा सेवा जोडणे सुलभ आणि वेगवान करेल, जेणेकरून ग्राहकांना काय उपलब्ध आहे ते समजेल.’ रेस्टॉरंट किंवा कपड्यांची दुकानं यासारख्या मोठ्या शोध असलेल्या कंपन्यांसाठी हे उपयुक्त ठरेल . कंपनीचे म्हणणे आहे की,’सध्या त्यांच्याकडे जगातील 80 लाखहून अधिक व्यावसायिक कॅटलॉग आहेत ज्यात भारतातील 10 लाख व्यावसायिक सामील आहे.’
Comments
Loading…