जागतिक निद्रा दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या अपयशाचा पाढा वाचत कुंभकर्ण अशी उपमा दिली आहे. त्याने त्यांच्या ट्विटवर ही देऊन टीका केली आहे. त्यामुळे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.
जयंत पाटील यांनी केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?, असा सवाल ट्विटरवर विचारत निशाणा साधला आहे. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात जवळपास 300 च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?”, असा सवाल जयंत पाटील यांनी ट्विटरवर केला आहे. दरम्यान त्यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Comments
Loading…