in ,

‘इटर्नल्स’ कोण आहेत? Avengers पेक्षा अधिक शक्तिशाली आहेत का? भेटा पृथ्वीच्या महान सुपरहीरोंना!

सुपरहिरोपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या मार्व्हल स्टुडिओजने भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. काही दिवसापूर्वी मार्व्हलचा ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. मात्र ही सिरीज संपल्यानंतर मार्व्हलचा आगामी चित्रपट कोणता असेल याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यातच मार्व्हलचा बहुप्रतिक्षित ‘इटर्नल्स’ हा सिनेमा या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मार्वल स्टुडिओने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या 25व्या चित्रपटानिमित्ताने “इटर्नल्स” या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात आपल्याला 10 सुपर हिरो दिसतील. हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या 6 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

“इटर्नल्स” हा ताऱ्यांच्या पलीकडील जगातील सुपरहिरोंचा एच गट आहे. ज्यांनी मानवी अस्तित्वाच्या प्रारंभापासून पृथ्वीचे रक्षण केले आहे. कित्येक वर्षांनी या सुपरहिरोंना पुन्हा मानवतेचे रक्षण करण्यासाठी एकत्र येण्यास भाग पाडले जाते जेव्हा राक्षस, रहस्यमयपणे परत येतात. मार्वल स्टुडिओजच्या “इटर्नल्स” मध्ये गेमा चेन, रिचर्ड मॅडेन, कुमाईल नानजियानी, लिया मॅकहुग, ब्रायन टायरी हेन्री, लॉरेन रिडलॉफ, बॅरी केओघन, डॉन ली, सलमा हायेकसह किट हॅरिंग्टन आणि पुरस्कार विजेती अँजेलिना जोली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. केव्हिन फीगे आणि नॅट मूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत, तर यावर्षी “नोमाडलँड” साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अकादमी पुरस्कार विजेता क्लो झाओ यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

“इटर्नल्स” दुसऱ्या ग्रहावरील म्हणजेच एलियन्स आहेत. जे हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर आली होते. एका संकटापासून मानवतेला वाचवण्यासाठी जेव्हा हे सुपरहीरो ते एकत्र येतात तेव्हा त्यांची शक्ती एकमेकांची ताकद वाढवते . जेव्हा ते आपल्या सुपर हिरोच्या अवतारात नसतात, तेव्हा ते सामान्य व्यंक्तिंप्रमाने जगत असतात.

“इटर्नल्स” सुपरहिरो लाइन-अप ही MCU चित्रपटातील नवीन पात्रांची सर्वात मोठी कास्ट आहे. एका अर्थाने हे देखील अद्वितीय आहे. कारण गटात पुरुषांइतकीच स्त्रिया आहेत आणि ही आतापर्यंतची सर्वात वेगळी आणि मजेशीर कास्ट आहे.

हे आहेत 10 “इटर्नल्स”

  • गेम्मा चेन सेर्सी ही मानवतेवर प्रेम करणारी सुपर हीरो असून ती लंडनमध्ये राहते आणि नैसर्गिक इतिहास संग्रहालयात काम करते.
  • रिचर्ड मॅडेन (गेम ऑफ थ्रोन्स फेम) इकारिस, एक मजबूत, गंभीर, मिशन-केंद्रित सुपर हीरो असून तो अत्यंत ताकदवान आहे.
  • सलमा हायेकने आजकाची भूमिका केली आहे.
  • अँजेलिना जोली एक शक्तिशाली सेनानी आणि योद्धा, थेनाची भूमिका साकारत आहे.
  • बॅरी केओघन ड्रुइगची भूमिका साकारत असून तिच्याकडे मनावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आहे.
  • कुमेल नानजियानी किंगोची भूमिका साकारत असून तो वृत्ती आणि स्वभावासह आउटगोइंग इटरनल आहे.
  • ब्रायन टायरी हेन्री फास्टोस, एक मास्टर शोधक आणि टेक्नोपॅथची भूमिका साकारतो.
  • डॉन ली गिलगामेशची भूमिका साकारत आहे, ज्यांच्याकडे खूप शक्ती आहे परंतु विनोदी शाश्वत आहे.
  • लॉरेन रिडलॉफ मकरी बनली असून ती विश्वातील सर्वात वेगवान महिला आहे.असे दाखवण्यात येणार आहे.
  • लिया मॅकहगने स्प्राइटची भूमिका केली आहे, जी हजारो वर्षांची असूनही 12 वर्षांच्या मुलीच्या रूपात अस्तित्वात आहे.

मानवतेचे प्रतिनिधित्व करत किट हॅरिंग्टन डेन व्हिटमॅनची भूमिका साकारणार आहे, जो सुपर हीरो नाही. तो सध्या लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये काम करतो आणि त्याला सेर्सीबद्दल विशेष आकर्षण आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक क्लो झाओ यांनी असे सांगीतात की, “आमच्याकडे अविश्वसनीयपणे प्रतिभावान, अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण कलाकार आहेत. या चित्रपटातील पात्र आणि त्यांच्या प्रवासातून होणारे बदल तसेच त्यांनी दर्शवलेले मानवी स्वभावातील बदल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘एनसीबीने आर्यन खानला सुपर डुपर स्टार बनवलं’; राम गोपाल वर्मांचं टि्वट

..म्हणून आज जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो!