in ,

WHO प्रमुखांनी लस वितरणाबाबत व्यक्त केली ‘ही’ चिंता

जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रसार होऊन एक वर्ष उलटले आहे. मात्र, कोरोना अटोक्यात आलेला नाही. कोरोनावर अनेक लसी तयार करण्यात आल्या आहेत. अनेक देशात लसीकरणही सुरू झाले आहे. मात्र, लसीकरणानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. यातच कोरोना नियमांचे पालन करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी दिला आहे. तसेच त्यांनी कोरोना लसीकरणाच्या असंतुलनावर चिंता व्यक्त केली.

गरीब देशांमध्ये कोरोना लसीकरणामध्ये धक्कादायक असंतुलन आहे. 220 देशांपैकी 194 देशात लसीकरण सुरू करण्यात आले आहे, तर अद्याप 26 देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले नाही. या 26 देशांपैकी 7 देशांना लसीचा पुरवठा करण्यात आला असून तिथे लवकरच लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे, तर येत्या काही दिवसांमध्ये आणखी पाच देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्यात येईल, असे टेड्रोस घेब्रायसस यांनी सांगितले.

गेल्या सहा आठवड्यांमध्ये 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना लसीचे 38 मिलियन डोस पुरवण्यात आले आहेत. यातील बर्‍याच देशांमध्ये सर्व आरोग्य कर्मचारी किंवा फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कव्हर करण्यासाठी लसीचा पुरेसा साठा नाही. लसींच्या जागतिक वितरणात अजूनही एक धक्कादायक असंतुलन आहे, असेही त्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रेमडेसिवीरबाबत केंद्र सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय

कुंभमेळ्यात भाविकांची गर्दी; कोरोना नियमांचं उल्लंघन