in

मुख्यमंत्री भाजपावर कठोर टीका का करताहेत? ठाकरे केंद्राला का भिडत आहेत?

श्रीकांत घुले

राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यापासून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे वारंवार केंद्र सरकार आणि भाजपावर कठोर शब्दात टीका करत आलेत, हे आपण बघितलंच आहे. उद्धव ठाकरे मात्र मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून शब्द फार जपून वापरत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासूनची उद्धव ठाकरेंची भाषणं जर नीट बघितली तर आपल्या लक्षात येईल की, ते मोदी-शाह किंवा केंद्र सरकारवर परखड शब्दांत टीका करत आहेत.

काही दाखले द्यायचे झाल्यास आणि त्यांची काही भाषणं आणि त्यातील मुद्दे पाहणं महत्त्वाचं आहे.

दसरा मेळाव्यातील भाषण –

‘दसरा मेळावा’ हा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा सोहळा असतो. शिवसेना प्रमुखांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाला मोठी परंपरा आहे. यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. मुख्यमंत्री ठाकरेंचं इथलं भाषण नीट ऐकणं महत्त्वाचं आहे.

काय म्हणाले ठाकरे?

 • मोहन भागवत यांनी या देशात सर्वांचे पूर्वज एक होते, असं म्हटलं. ते खरं आहे. मग विरोधी पक्षांचे पूर्वज परग्रहावरून आले होते का. आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते का? लखीमपूर खिरीमध्य जे झालं त्या शेतकऱ्यांचे पूर्वच परग्रहावरून आले होते का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
 • “92-93 साली शिवसेना उतरली नसती तर सध्या सत्तेसाठी टपून बसलेले कुठं राहिले असतं कळलंही नसतं. हिंदुत्वाला सध्या सर्वाधिक धोका हा उपटसुंब नवहिंदूंपासून आहे. हिंदुत्वाला सर्वाधिक धोका होता, त्यावेळी केवळ बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाच्या शत्रूंसमोर उभे राहिले होते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट मोदी-शाह जोडगोळीवर निशाणा साधला. आम्हीच खरे हिंदुत्ववादी असून भाजपा हिंदुत्वाचं ढोंग करतंय, असंच ठाकरेंनी अधोरेखित केलं.
 • आणखी एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांनी थेट मोदींवरच टीका केली. मै फकीर हू, झोली उठाके… असे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
 • केंद्राचे अधिकार किती, राज्याचे अधिकार किती यावर चर्चा व्हायला हवी. केंद्राएवढेच सगळे राज्य सार्वभौम आहेत, असं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केल्यानंतर ठामपणे सांगितलं होतं. हा दाखला देऊन मुख्यमंत्री हे सुचवू पाहत आहेत की, तुमचा (केंद्राचा) दबाव राज्य म्हणून आम्ही सहन करणार नाही.
  दसरा मेळाव्यातील भाषणानंतर मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळीही जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी व्यासपीठावरच बसलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात टीका केली.
 • आजचा दिवस आदळआपट करण्याचा नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ‘मातीचा काही संस्कार असतो, मातेचे संस्कार असतात. या मातीत बाभळीचीही झाडे उगवतात, तशीच आंब्याची झाडे उगवतात. माती जोपासते. कोणी काही म्हणाले तरी शिवसेनेचे कोकणाशी वेगळे नाते आहे.
 • पाठांतर करून बोलणे वेगळे, तळमळीने बोलणे वेगळे आणि मळमळीने बोलणे आणखी वेगळे. खोटे बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकले होते, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. राऊतांनी तुम्हाला पेढा दिला. त्या पेढ्यातील गोडवा अंगी बाणवावा लागतो. सगळीकडेच राजकारण करून चालत नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परवानगीसाठी तुम्ही फोन केल्यानंतर मी लगेच अर्जावर सही केली होती, असे स्मरणही ठाकरे यांनी राणे यांना करून दिले.
  या दोन्ही कार्यक्रमातून हे स्पष्ट दिसून येतंय की उद्धव ठाकरे आता थेट भाजपाला शिंगावर घेत आहेत. हे कमी की काय म्हणून औरंगाबादेत खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या उद्धाटनाचा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर सरन्यायाधीश, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि भागवत कराडही उपस्थित होते. इथंदेखील मुख्यमंत्र्यांनी वेळ साधत परमबीर सिंह यांना टोला लगावला. ‘इथं तक्रार करून तक्रादारच गायब झाला’, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता टोला लगावला.
  दसरा मेळावा, चिपी विमानतळाचं उद्धाटन आणि औरंगाबादेतील खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन या तिन्ही कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच नव्हे तर थेट मोदींवरच निशाणा साधलाय.
  राजकारणात, कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हणतात. मात्र, गेल्या काही काळातील मुख्यंमत्र्यांच्या वक्तव्यांमधून आपण (शिवसेना) कधीच भाजपासोबत जाणार नाही, असं तर मुख्यमंत्री सूचवत नाहीयेत ना? किंवा अशी वक्तव्य करून मुख्यमंत्री भाजपासोबतची युतीची दारं मुख्यमंत्री स्वत: बंद तर करत नाहीयेत ना, हे येणारा काळच सांगेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

17 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी