in

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीची मुलासह आत्महत्या

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढणारी मोठी संख्या आणि आरोग्य सुविधांचा तुटवडा यामुळे नकारात्मक चित्र निर्माण होत आहे. यात नांदेड मधून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. कोविड-19 संसर्गामुळे पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीने 3 वर्षांच्या मुलासह आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात ही घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे

तेलंगणातून गंदम कुटुंब नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात मजुरीसाठी आलं होतं. बालाजी मंदिराच्या पाठीमागे राहून मजुरी करत ते उदरनिर्वाह करत होते. दरम्यानच्या काळात 40 वर्षीय पती शंकर गंदम यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांना लोहा येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी उपचारादरम्यान शंकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

पतीच्या निधनाची बातमी समजताच पद्मा गंदम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या पश्चात जगण्याची कल्पना असह्य झाल्याने त्यांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांचा मुलगा लल्ली याच्यासह पद्मा यांनी सुनेगाव येथील तलाव गाठलं. दोघी मुलींना घरी ठेवून त्यांनी धाकट्या लेकासह तलावात उडी घेतली.

लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे ही करुण घटना घडली. बुधवारी पहाटे मायलेकाने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दिवसागणित कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. कालच्या अपडेटनुसार, राज्यात 58,952 रुग्णांची नोंद झाली असून 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर कोरोनाच्या भीतीमुळे आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय!