राज्यातील लॉकडाऊनमुळे व्यापारी, कामगार वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे.यामुळे त्यांच्यासमोर मरणाशिवाय कुठलाच पर्याय उरणार नाही आहे. त्यामुळे सरकारने दोन दिवसांत विचार करावा, नाही तर मी लॉकडाऊन विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे अमरावती जिल्ह्यात कडक निर्बंध व लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनला अमरावतीच्याचं खासदार नवनीत राणा यांनी विरोध दर्शवला. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिसी बैठकीत यशोमती ठाकूर यांनी अमरावतीची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होती असे म्हणत त्यांनी ठाकूर यांच्यावरही टीका केली.
जिथे गरज नव्हती तिथं लॉकडाऊन केला हे चुकीचे असून माझा या लॉकडाऊनला विरोध असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. येत्या दोन दिवसात अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊन न हटवल्यास मी स्वतः रस्त्यावर उतरणार असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.
Comments
Loading…