in

‘या’ वेळेच्या अटीसह अखेर कोल्हापुरात व्यापार आजपासून सुरु

कोरोनाची स्थिती ही उर्वरित महाराष्ट्रात आटोक्यात येत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती मात्र चिंताजनक होती. यामुळे इतर जिल्ह्यांतील निर्बंध हटवल्यानंतर देखील कोल्हापुरातील निर्बंध हे कायम ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात तीन मंत्री असताना देखील कोरोना आटोक्यात आणण्यात प्रश्नासनाला अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

मागील दीड महिन्यामध्ये अत्यावश्यक वगळता इतर दुकाने खुली करण्यावरून जिल्हा प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. कुठल्याही परिस्थितीत दुकानं उघडणार मग पोलीस किंवा लष्कर आलं तरी पर्वा नाही, अशी आक्रमक भूमिका कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी घेतली होती.

मागील आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट ९.७ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने शनिवारी जिल्हा प्रशासनाने आजपासूनसोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शासनाच्या निकषानुसार जिल्ह्याचा समावेश आता कोरोनाच्या तिसऱ्या स्तरामध्ये झाला असून, अत्यावश्यक सेवा वगळता गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले सगळे व्यवसाय, दुकाने उद्यापासून खुली होणार आहेत, मात्र काही बाबतीत निर्बंध कडक ठेवण्यात आल्याचे नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे.

हे सुरू रहणार –

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने रोज सकाळी ७ ते ४ यावेळेत.
  • अत्यावश्यक वगळता अन्य सर्व दुकाने व कार्यालये. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ यावेळेत.
  • सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, फिरणे, सायकलिंग, खेळ, सर्व दिवशी सकाळी ५ ते ९ पर्यंत.
  • रेस्टॉरंट सर्व दिवशी फक्त पार्सल व घरपोच सेवा.
  • चित्रीकरण अलगीकरणाच्या व्यवस्थेसह सर्व दिवशी सकाळी ७ ते ४.
  • लग्नसमारंभ २५ माणसांत, अंत्यविधी २० माणसांत.
  • स्थानिक स्वराज्य तसेच सहकारी संस्थांच्या सभा सभागृहाच्या ५० टक्के.
  • व्यायामशाळा, केशकर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर सर्व दिवशी सकाळी ७ ते ४ या वेळेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाशिकनंतर आता राज ठाकरे पुण्यात

ZEE Marathi |’देवमाणूस’ मालिका होणार बंद