in

‘पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं’

हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवसांत पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेसह इतर सर्व यंत्रणांनी घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी. तसेच, समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा त्यांनी आज दृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला, त्यानंतर ते बोलत होते. या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते.

पावसाचा जोर रात्री वाढतो आहे. पाणी उपसा करणारी यंत्र सतर्क ठेवावीत. मोडकळीस आलेल्या इमारती, मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा. तसेच, सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत. आपापल्या नियंत्रण कक्षांना एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहावे, कोविड केंद्र व फिल्ड रुग्णालयांतील डॉक्टर्स व वैद्यकीय पथकांनाही मदतीसाठी तयार ठेवावे. तसेच, अर्धवट बांधकामे, मेट्रोची व इतर कामे यामधून भरपूर पाऊस झाल्यास पाणी साचून दुर्घटना होऊ नये, त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टो सारखे रोग पसरवू नयेत म्हणून, विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावे, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; इंधन दरवाढीसह कोरोनावरून विरोधक सरकारला घेरणार

Ashadhi Wari 2021 | संत मुक्ताई पालखीचं मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे प्रस्थान