ज्येष्ठ लेखक आणि चित्रपट निर्माते सागर सरहदी यांचे निधन झाले आहे. ते 87 वर्षांचे होते. सागर सरहदी यांनी त्यांच्या मुंबईच्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना कार्डियाक केअर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयासंबंधित त्रास होत होता. 2018मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात
सुत्रानुसार, सागर यांचे अंत्य संस्कार आज (22 मार्च) दुपारी आयोजित केले जाऊ शकतात.
सागर सरहदी यांचा जन्म 11 मे 1933 रोजी पाकिस्तानमध्ये झाला होता. मात्र, या लेखकाने आपले घर पाकिस्तानात सोडले आणि ते आधी दिल्लीतील किंग्सवे कॅम्प येथे आले. त्यानंतर, मग ते मुंबईतील एक छोट्या भागात वास्तव्यास आले. मोठ्या संघर्षानंतर सागर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान मिळालं . सागर सरहदी यांना यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने योग्य ओळख मिळाली. सरहदी यांनी नूरी, बाजार, सिलसिला, चांदनी, दीवाना आणि कहो प्यार प्यार है, असे चित्रपट लिहिले आहेत.
प्रसिद्ध चित्रपट ‘बाजार’मधून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेत्री स्मिता पाटील, फर्रुख शेख आणि नसीरुद्दीन शाह प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. सागर सरहदी या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक होते. सागर सरहदी यांच्या मृत्यूमुळे चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना खूप दुःख झाले आहे.
Comments
Loading…