in , ,

कोरोनाविरोधातील लढाईत चीनचा भारताला मदतीचा प्रस्ताव

भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांनी पुढे येत भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चीननंदेखील आता भारताला मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवत मदतीचा प्रस्ताव दिला आहे.

भारतातील चीनचे राजदूत सुन वेईदोंग यांनी टि्वट करत याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या महासाथीविरोधात लढण्यासाठी चीन भारताला हवी ती मदत करण्यास तयार आहे. तसंच चीनमध्ये तयार करण्यात आलेली महासाथीच्या विरोधातील सामग्री जलदगतीनं भारताला पोहोचवली जात आहे, असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी गुरुवारी म्हटलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘…अन्यथा या देशात मुडद्यांचं राज्य’

‘दुसऱ्या देशांना लस दिल्यामुळेच आपल्याला कमतरता’