in

Yavatmal Bus | 25 तासानंतर पूरातून काढली बस; घटनास्थळी बचाव पथक तैनात

यवतामळमधील उमरखेड येथील दहागाव जवळ पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी घडला. या बसमध्ये सहा ते सात प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. रात्री मुसळधार पावसामुळे दहागाव येथील नालाच्या पुलावरून पाणी वाहत होते. याच नाल्यावरून एसटीचालकाने ही बस नेल्याने ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

आतापर्यंत तीन मृतदेह मिळाले आहे. तर, दोघांना वाचविण्यात यश आले. रात्र झाल्याने काल बस काढण्याचे काम थांबविण्यात आले होते. आज सकाळी नऊ वाजता पासून पुन्हा बस काढण्याला सुरुवात झाली आहे. घटनास्थळी बचाव पथक तैनात आहे. या घटनेतील चालकाचा अजूनही शोध लागलेला नाही.

What do you think?

-7 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम; हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा

“भाजपा कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे”, संजय राऊतांचा गंभीर आरोप