in

आता घरातच करु शकता कोरोना चाचणी!

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएआर) घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान याचा वापर कसा आणि कोणी करावा यासंबंधी आयसीएमआरकडून मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता घरातही रॅपिड अँटिजन किटच्या सहाय्याने कोरोना चाचणी करणे शक्य आहे.

आयसीएमआरने निर्णय जाहीर करताना ज्यांना लक्षणं आहेत तसंच जे प्रयोगशाळेतील चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांनीच याचा वापर करावा असं स्पष्ट केलं आहे. सरसकट चाचणी करु नका असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.

“पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रत्येकाला ट्रू पॉझिटिव्ह म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. लक्षंण नसणारे जे रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये निगेटिव्ह आले आहेत त्यांनी तात्काळ आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी,” असं आयसीएमआरने सांगितलं आहे.

आयसीएमआरकडून पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीच्या रॅपिड अँटिजन टेस्ट किटला मान्यता देण्यात आली आहे. मायलॅबने The CoviSelfTM (PathoCatch) COVID-19 OTC Antigen LF device ची निर्मिती केली आहे. घरी चाचणी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरमधून अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. या अॅपमध्ये देण्यात आलेल्या प्रक्रियेनुसारच चाचणी करता येईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SSC Board Exam | दहावीच्या परीक्षेबाबत आज निर्णय?

राज्यात म्युकरमायकोसिसचे ९० बळी