in ,

इंस्टाग्रामवर पाहता येणार तुमचा आवडता कंटेन्ट; सेटिंगमध्ये करा सोपे बदल…

फोटो शेयरिंग अ‍ॅप इंस्टाग्रामवर युजर्सला फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करता येतात. विशेषत: तरुणांमध्ये इंस्टाग्रामची लोकप्रियता प्रचंड आहे. इंस्टाग्रामवर विविध प्रकारचा कंटेंट असतो. यापैकी सर्वच कंटेंट सर्वांचाच आवडतो असं होत नाही. काही कंटेंट युजर्सला आवडतो तर काहींना आवडत नाही. पण आता युजर्सला त्यांच्या आवडीनुसार इंस्टाग्रामवर कंटेंट सेट करता येणार आहे. त्यासाठी युजर्सला Explore पेजला रिस्टोर किंवा Customize करावं लागणार आहे.

यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन कंटेंट सेट करता येऊ शकतो. काय आहे प्रोसेस? Android किंवा iOS वर जाऊन स्मार्टफोनमधील सर्च हिस्ट्री क्लियर करायला हवं. त्यानंतर इन्स्टाग्रामवर एक फ्रेश पेज दिसेल. त्यावर युजर्सला आवडीचा कंटेंट सेट करता येईल. त्यानंतर प्रोफाईल सेक्शनवर जाऊन उजव्या बाजूला असलेल्या Hamburger Menu वर क्लिक करा. त्यानंतर सेटिंगमध्ये Security Option वर क्लिक करा. त्यात तुम्हाला Data And History List मध्ये सर्च हिस्ट्रीचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Clear All चा पर्याय दिसेल.

त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर Pop-Up वरही Clear All करा. त्यानंतर सर्च हिस्ट्री क्लियर होईल आणि इन्स्टाग्रामवरील कंटेंट रिसेट होईल. त्यानंतर युजरला जो कंटेंट हवा आहे तोच पाहायला मिळेल. दरम्यान काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामने आणखी एका नव्या फीचरची घोषणा केली आहे. इंन्स्टाग्राम टिकटॉक इन्स्पायर्ड फिचर टेक्स्ट-टू-स्पीच आणि व्हॉईस इफेक्ट जोडणार आहे. इंस्टाग्रामच्या टेक्स्ट-टू-स्पीच फीचद्वारे युजरला व्हिडिओमध्ये आपल्या आवाजाचा उपयोग करण्याची सुविधा मिळेल. दरम्यान, इंन्स्टाग्रामने व्हॉईस इफेक्टही जोडले आहेत. या नव्या फीचरमुळे आता वेगवेगळ्या आवाजांसह व्हिडिओ बनवणं अधिक मजेशीर होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“वस्तुस्थिती आपणापासून लपवली गेली असेल, म्हणूनच…,” नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना पत्र

Gold-Silver Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याचे भाव वाढले; जाणून घ्या दर